टाळी वाजवा, फोनच सांगेल त्याचा ठावठिकाणा


अनेकांना मोबाईल सतत हातात ठेवायची सवय असते. त्यामुळे कांही काम करायची वेळ आली तर हे लोक कुठेतरी मोबाईल ठेवतात व मग सापडत नाही म्हणून शोधाशोध करावी लागते. अशावेळी दुसर्‍या फोनवरून आपला नंबर फिरवायचा व रिंग वाजली की त्या अनुरोधाने फोन शोधायचा ही नेहमीची युक्ती वापरली जाते. पण समजा दुसरा फोन घरात नसेल तर तुमच्या मदतीसाठी एक अॅप आले आहे. क्लॅप टू फाईंड म्हणजे टाळी वाजवा आणि शोधा या नावाने आलेले हे अॅप प्लेस्टोर मधून इन्स्टॉल करून घेता येणार आहे.

तुमचा फोन सायलंट मोडमध्ये असेल तरी तुम्ही टाळी वाजविली की हे अॅप आपोआप ऑन होते व फोन स्वतःच तो कुठे आहे ते सांगतो. त्यासाठी फोन ऑन करून प्रथम तीन वेळा टाळी वाजवायची म्हणजे अॅप फिचर अॅक्टीव्हेट होते.हे अॅप तुमची टाळी रेकॉर्ड करून घेते. नंतर फोन शेाधायची वेळ येईल तेव्हा दोनवेळा टाळी वाजविली तरी काम होते. तुम्हाला फोनने त्याची जागा कशी सांगावी यासाठी विविध ऑप्शन्स आहेत. व्हायब्रेट किंवा लाईट फ्लॅश करणे असेही सेटींग यात करता येते. फोनने आवाज कितीवेळा करायचा हेही आपण ठरवू शकतो. किती दूरवरून टाळी वाजली तरच आवाज येईल हे सेटींगही यात करता येते. विशेष म्हणजे गर्दीत, ऑफिसमध्ये क्लॅप डिटेक्शन सहज ऑफ करता येते.

Leave a Comment