अॅपलमध्ये सर्वाधिक पगार घेणारी महिला अँजेला एडरसन


अॅपल म्हटले की सीईओ टीम कुक नजरेसमोर सर्वप्रथम येणारच. त्यातून वर्षअखेर आली की कुकसाहेबांनी या वर्षात किती पगार घेतला याची चर्चा सुरू होणारच. पण अंदरकी बात अशी आहे की अॅपलमध्ये सर्वात जास्त पगार घेण्यात टीम कुक नाही तर एंजेला अंडरसन ही महिला प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून सतत तीन वर्षे तिने आपले हे रेकॉर्ड कायम राखले आहे.

यंदाच्या वर्षात अँजेलाने २४.२ दशलक्ष डॉलर्स कमाई केली आहे. ती सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रिटेल अॅन्ड ऑनलाईन स्टोअर्स या पदावर कार्यरत आहे. ऑनलाईन स्टोअर्ससाठी उत्तम धोरणे आखणे व त्याची यशस्वी अम्मलबजावणी करणे यासाठी तिला उत्तम परफॉर्मर म्हणून निवडले गेले आहे. टीम कुकना यावर्षी १२.८ दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत तर अँजेलाला जवळजवळ दुप्पट रक्कम मिळाली आहे. तिचा मूळ पगार आहे २० दशलक्ष डॉलर्स. त्यावर तिला ८८ हजार डॉलर्स भत्ता व ३.१ दशलक्ष डॉलर्स तिने बजावलेल्या कामगिरीबद्दल मिळाले आहेत. अर्थात सीईओपेक्षा अधिक वेतन घेण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही. गेली तीन वर्षे ती बेस्ट परफॉर्मर ठरल्याने भक्कम पगार घेते आहे.

Leave a Comment