ऐन मोक्याच्या ठोक्याला झाले व्हॉट्सअॅप ‘क्रॅश’


मुंबई – भारतासह अनेक देशांमध्ये रविवारी रात्री ऐन १२ वाजता जगातील सर्वात जास्त पॉप्युलर असलेले इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप डाऊन झाले. सर्वजण रात्री बारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवरून शुभेच्छा संदेश देताना व्हॉट्सअॅपवरून संदेश जाणे बंद झाल्याने ट्विटरवर हा टॉप ट्रेंडिग टॉपिक बनला होता.

सर्वचजण नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा आसरा घेतात. पण, ओव्हरलोडमुळे व्हॉट्सअॅप रविवारी रात्री ठिक १२ वाजताच्या सुमारास डाउन झाल्यामुळे ज्यांनी पहिल्या २ ते ३ मिनिटांपर्यंत नवीन वर्षाचे संदेश दिले ते पोहचले. पण, त्यानंतर मात्र हे संदेश आप्तजनांपर्यंत न पोहोचल्यामुळे सर्वांचा हीरमोड झाला. त्यानंतर रात्री १ वाजेपर्यंत व्हॉट्सअॅप बंद होते. त्यानंतर व्हॉटअॅप सुरू झाल्यावर धडाधड मेसेज येऊ लागले.

Leave a Comment