जिओ आजपासून आपल्या ग्राहकांना देणार हे नवे दोन प्लान


मुंबई : २०१७ मध्ये दूरसंचार क्षेत्रात हंगामा उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओच्या नव्या प्लान्सचा धडाका या वर्षातही कायम राहणार आहे. आजपासून जिओ आपल्या यूजर्सना दोन नव्या प्लान्सची सुविधा देणार आहे. दोन नवे प्रीपेड ऑफर्स जिओने नव्या वर्षात आणले आहेत. १९९ आणि २९९ रुपयांचे हॅपी न्यू ईयर प्लान जिओने लाँच केले आहेत. यात यूजर्सना आधीच्या तुलनेत अधिक डेटा मिळणार आहे.

यूजर्सला १९९च्या प्लानमध्ये १.२ जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री वॉईसकॉल, अनलिमिटेड एसएमएस आणि २८ दिवसांसाठी सर्व प्राईम मेंबरना जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. तर जिओने २९९ रुपयांचा प्लानही लाँच केला. यात युजर्सना दररोज २ जीबी ४ जी स्पीडने डेटा मिळेल.

युजर्सना जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला १.२ जीबी डेटा मिळतो आहे. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ युजर्सना संपूर्ण महिन्यात ३३.६ जीबी डेटा मिळणार. फ्री व्हॉईस कॉलिंगशिवाय जिओचे अन्य फायदेही मिळणार आहेत.

जिओने २९९च्या रुपयांच्या दुसऱा प्लानही लाँच केला आहे. इतर सर्व प्लानच्या तुलनेत हा प्लान स्वस्त आणि मस्त आहे. यात केवळ तुमचे पैसेच वाचत नाहीत तुम्हाला डेटाही अधिक मिळत आहे. तुम्हाला या प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळतो म्हणजे महिन्याला ५६ जीबी डेटा तुम्ही वापरु शकता.

Leave a Comment