अद्यापही सुरू आहे भारतात असलेल्‍या या अमूल्‍य खजिन्‍यांचा शोध


एके काळी ‘सोने की चिड़िया’ असे भारताला म्‍हटले जायचे. आजही परराष्‍ट्रात भारतात असलेल्‍या राजा- महाराजांच्‍या खजिन्‍यांची, श्रीमंतीची चर्चा होत असल्यामुळे सातत्‍याने भारतावर परकियांनी आक्रमणे केली. आपला अमूल्‍य खजिना त्‍यांच्‍यापासून वाचावा, यासाठी तो खजिना राजा-महाराज गुप्‍त ठिकाणी ठेवत असत. अशा अनेक राजांचा अब्‍जो रुपयांच्‍या खजिन्‍याचा आजही शोध सुरू असून कोणकोणते आहेत ते खजिने त्‍याची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

नदीर शाहने वर्ष १७३९मध्‍ये भारतावर हल्‍ला करून दिल्‍लीवर ताबा मिळवला होता. नदीर शाहा याने यामध्‍ये संपूर्ण दिल्‍लीला लुटले. शेकडो क्लिंटल खजिना त्‍याच्‍याजवळ जमा झाला. यात मयूर तख्त, सोन्‍या, चांदीचे लाखो सिक्‍के, दाग-दागिने आणि कोहिनूर हिऱ्याचाही समावेश होता. त्‍यातील काही भाग त्‍याच्‍या काही अधिकाऱ्यांनी मायदेशी परत जात असताना तो भारतातच गुप्‍त ठिकाणी लपवून ठेवल्‍याचे सांगितले जाते. अजूनही त्‍याचा शोध सुरू आहे.

मगध इसवी सन पूर्व पाचव्‍या शतकात हा साम्राज्‍याचा सम्राट होता. मौर्य साम्राज्‍याचा त्‍याच्‍या नंतर विस्‍तार झाला. आजही बिंबिसारचा खजिना बिहारच्‍या राजगीरमधील दोन गुहेत असल्यामुळेच या गुहांना सोन भंडार गुहा असे म्‍हणतात. अतीप्राचिन लिपित काही तरी या गुहेवर लिहिलेले आहे. ही लिपी आतापर्यंत कुणालाच वाचता आली नाही. असे म्‍हणतात की, हा उल्‍लेख खजिन्‍याच्‍या संदर्भात आहे.

‘अलवर’ किल्‍ला राजस्थानात असून आपल्‍या आयुष्‍याच्‍या शेवटी मुगल सम्राट शहाजहान हा या ठिकाणी होता. त्‍याने या काळात किल्‍ल्‍यावरील गुप्‍त ठिकाणी खजिना लपवून ठेवल्‍याचे सांगितले जाते.

मान सिंह (प्रथम) यांनी लपवलेल्‍या खजिनाला एतिहासिक संदर्भ असल्यामुळेच या खजिन्‍याला आणिबाणीच्‍या काळात शोधण्‍याचे काम केंद्र सरकारने राबवले होते. पण त्‍यात सरकारला यश मिळाले नाही.

मोक्कम्बिका मंदिर कर्नाटकच्‍या पश्चिमी घाटात कोलूरमध्‍ये असून मोठ्या प्रमाणात खजिना या ठिकाणी असल्‍याचे स्‍थानिक रहिवाशी सांगतात. मंदिराच्‍या पुजाऱ्यांनी या बाबत सांगितले की, सापांच्‍या खास प्रतिकृती मंदिरात आहे. पौणाणिक कथेच्‍या आधारे विचार केल्‍यास हा साप खजिन्‍याचे रक्षण करतात, अशी अख्‍यायिका आहे.

सम्राट अकबराच्‍या दरबारात मान सिंह (प्रथम) हे उच्‍च पदावर होते. अफगानिस्तानावर १५८०मध्‍ये विजय मिळवला. त्‍यांनी त्‍यात लुटलेला खजिना गुप्‍त ठिकाणी लपवून ठेवल्‍याचे सांगितले जाते.

अनेक वर्ष हिऱ्यांसाठी आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्‍ये कृष्णा नदीचे किनारे प्रसिद्ध होते. हा प्रदेश एकेकाळी गोलकुंडा राज्यात सहभागी होता. जागतिक कीर्तीचा कोहिनूर हीरा हासुद्धा येथील खाणीतलाच होता. असे सांगितले जाते की, या ठिकाणी अजूनही अनेक हिरे आहेत.

Leave a Comment