दररोज 8 जणांसोबत बेड शेअर करुन झाली 6 कंपन्‍यांची मालकीण


मुंबई- नशीबपुढे कोणाचे काहीच चालत नाही असे म्हणतात. जसे एका क्षणात आकाशातील उल्‍केला पृथ्‍वीवरील पाषाण करून सोडते तर वर्षांनुवर्षे कोळशाच्‍या खाणीत खितपत पडलेल्‍या काचाच्या तुकड्याला हिरा करते असेच काहीसे अमेरिकेतील एका महिलेसोबत घडले आहे.

तिच्‍यावर दोन वेळचे पोट भरण्यासाठी वेश्‍या व्‍यवसाय करणाऱ्याची वेळ आली होती. पण ती आज एक-दोन नव्हे तर तब्बल 6 कंपन्‍यांची मालकीन आहे. त्याचबरोबर तिने लिहिलेले पुस्‍तकही खूप लोकप्रिय झाले आहे. तिच्या पुस्तकाच्या विक्रीने देखील विक्रम केलेला आहे. डेनी जॉनसन असे या महिलेचे नाव आहे.

रिलेशनशिप मार्केटिंगमधील डेनी जॉनसन हे एक प्रसिद्ध नाव आहे. या शिवाय ती लेखक, वक्‍ता आणि अर्थ सल्‍लागार आहे. ती लोकांना आपल्‍या कंपनीच्‍या माध्‍यमातून कॉरपोरेट ट्रेनिंग देते. डेनीवर फोर्ब्‍स मासिकानेही कव्हर स्‍टोरी केली होती.

केवळ आपल्‍या एका कल्‍पनेच्‍या भरोवशावर डेनीने एका वर्षांत 2.5 लाख डॉलरची (1.6 कोटी रुपये) कमाई केली. त्‍यानंतर दुसऱ्याच वर्षी जवळपास 10 लाख डॉलर (6.7 कोटी रुपये) कमावले आणि ती आज सहा कंपन्‍यांची मालकीन आहे. डेनी आणि तिच्‍या पतीने आपली 90 टक्‍के संपत्‍ती दान करण्‍याचा निर्णय घेतला आहे. एके काळी तिला दोन वेळच्‍या जेवणासाठी 8 वेगवेगळ्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागले होते.

बालपणीचे आणि तारुण्‍याचे डेनीचे आयुष्‍य खूप खडतर होते. तिचे आई-वडील आणि ती स्‍वत: ड्रग अॅडिक्‍ट होती. तिचे लहान वयातच लग्‍न झाले. पण डेनीकडे होते नव्‍हते ते सर्व लुटून नवऱ्याने पळ काढला. त्‍यानंतर तिच्‍याकडे ना घर होते ना दार. खिशात होते केवळ 2.3 डॉलर आणि वडिलांची एक कार. तिने याच कारला आपले घर केले होते.

ती एके दिवशी नशेत धुंद होऊन आपल्‍या कारमध्‍ये झोपण्‍यासाठी आली. तिला कारमध्‍येच त्‍यावेळी तिने विकत घेतलेले एक पुस्‍तक दिसले. त्‍यातूनच तिला वजन कमी करण्‍याबाबत पुस्‍तक लिहावे, असे सूचले. ती की कल्‍पना प्रत्‍यक्षात साकारही केली. याच पुस्‍तकाने तिची कमाई सुरू झाली. पुढे तिने स्‍वत:च्‍या कंपन्‍याही सुरू केल्‍या.

डेनीने फोर्ब्‍सच्‍या मुलाखतीत सांगितले, माझी परीक्षा पाहाणाराच तो काळ होता. मी त्‍या दोन महिन्‍यांत नशेतच होती. या काळात 8 वेगवेगळ्या पुरुषांसोबत मी शरीर संबंधही ठेवले. ते यासाठीच की आपल्‍या दोन वेळच्‍या जेवणाची सोय लागावी.

Leave a Comment