हैदराबादच्या तरुणीने पायाच्या सहाय्याने रेखाटली जगातली सर्वात मोठी पेंटिंग


हैदराबाद – हैदराबादच्या एका तरुणीने १४० स्केअर मीटरची पेंटिंग पायाच्या सहाय्याने रेखाटली आहे. ही पेंटिंग जगातली सर्वात मोठी पेंटिंग असल्याचा दावा करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये या पेटिंगची नोंद होण्यासाठी ती प्रयत्न करत आहे.

जगातली सर्वात मोठी पेंटिंग रेखाटल्याचा दावा जान्हवी मगांन्ती (१८) या तरुणीने केला आहे. यापुर्वी ब्रिटेन विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने १०० स्केअर मीटर पेंटिंग रेखाटण्याचा विश्वविक्रम केला होता. जान्हवीने हा विश्वविक्रम मोडत १४० स्केअर मीटरची पेंटिंग रेखाटण्याचा नवीन विक्रम केला आहे. जान्हवी ही उत्तम नर्तकी, शास्त्रीय गायिका असुन तिने राष्ट्रीय स्तरावर बॉस्केटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे. तिने नुकताच नृत्य करताना पायाच्या सहाय्याने कमळ आणि मोराचे पंख रेखाटले आहे.

Leave a Comment