डिसेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन व्यवहारांमध्ये १५५ कोटींची फसवणूक – रवी शंकर प्रसाद


नवी दिल्ली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे तब्बल २२ हजार ७०० प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती शुक्रवारी दिली.

यात एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे झालेल्या फसवणुकीचा समावेश आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये १५५ कोटींची फसवणूक २१ डिसेंबर २०१७ पर्यंत झाल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली आहे. सायबर सुरक्षेचा आढावा वारंवार भारतीय रिझर्व बँक, सरकारचे विविध मंत्रालये तसेच विभागांनी घेतला पाहिजे. त्याचबरोबर सायबर व्यवहारांमधील सुरक्षा बळकट करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आवाहनही रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत बोलताना केले.

Leave a Comment