जगभरात सर्वात वेगवान रेकॉर्ड्स


जगभरात अनेक रेकॉर्डस दरवर्षी नोंदविली जात असतात. त्यात सर्वात वेगवान कोणती रेकॉर्ड नोंदविली गेली हे आपल्याला माहिती आहे काय? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी.


जगात क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक व एक दिवसीय सामन्यात शतक नोंदविण्याचे रेकॉर्ड एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने १८ चेंडून अर्धशतक तर ३१ चेंडूत शतक फटकावले आहे. जगात सर्वात वेगवान पुरूष धावपटू उसेन बोल्ट आहे तर वेगवान महिला धावपटूचे रेकॉर्ड अ्रमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर च्या नावावर आहे.


जगात सर्वात वेगवान ट्रेन आहे जपानची मॅग्लेव्ह. तिचा वेग आहे ताशी ६०० किमी. सर्वात वेगवान कार आहे कोईंगसँग अरेरा आर. तिचा वेग आहे ताशी २७३ मैल तर सर्वात वेगवान बाईक आहे डुकाटीची १०९८ एस. तिचा वेग आहे ताशी १६९ मैल म्हणजे साधारण २७० किमी. जगात सर्वात वेगवान प्राणी आहे चित्ता.तर सर्वात वेगाने पोहणारा मासा आहे सील. जगात


सर्वाधिक वेग आहे प्रकाशाचा. इलेक्ट्राॅन प्रोटॉन व न्यूट्राॅन मध्ये प्रोटोन सर्वात वेगाने फिरतो. तर इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड द. कोरियात आहे. हा स्पीड आहे साधारण ३३.५ एमबीपीएस. सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे गुरू.विशेष महणजे गुरु आपल्या ग्रहमालेतील मोठा ग्रह आहे.


आपल्या हाताच्या बोटांपैकी मध्यमेचे नख सर्वाधिक वेगाने वाढते. जॉन टेलर याच्या नावावर सर्वाधिक जलद गिटार वाजविण्याचा विक्रम नोंदले गेला आहे तर सर्वाधिक जलद बोलणारी महिला आहे फ्रेन कॅपो. केल्विन मेडिना याच्या नावावर सर्वाधिक जलद खाण्याचा विक्रम असून त्याने २३.६२ सेकंदात १२ इंचाच्या पिझ्झाचा फडशा पाडला होता. सर्वाधिक वेगाने पापण्या मिचकावण्यात जेरेमी ओझे आघाडीवर असून त्याने १ मिनिटात ७८०० वेळा पापण्या मिचकावल्या आहेत.

Leave a Comment