अंतराळ स्थानकातील अंतराळवीर १६ वेळा करणार नववर्ष साजरे


रविवारी रात्री नवीन वर्षाचा प्रारंभ होत असून आपण सर्वजण एकदाच हा वर्षारंभ साजरा करू शकणार आहोत. मात्र त्याचवेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील सहा अंतराळवीर तब्बल १६ वेळा नववर्ष साजरे करण्याचा आनंद लुटू शकणार आहेत. सध्या या स्थानकात अमेरिकेचे तीन, रशियाचे दोन व जपानचा एक असे सहा अंतराळवीर आहेत.

पृथ्वीपासून ४०२.३ किमीवर अंतराळात असलेले हे स्थानक ९० मिनिटात १ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे त्यांना चोवीस तासात १६ वेळा सूर्योदय व सूर्यास्त पाहता येतो. त्यामुळेच अंतराळ स्थानकातील अंतराळवीर १६ वेळा नवीन वर्षाचा सूर्योदय पाहू शकणार आहेत व म्हणूनच ते १६ वेळा नववर्ष साजरे करू शकणार आहेत. रविवारी नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी ते त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत अ्से नासाकडून सांगितले गेले आहे.

Leave a Comment