नवी दिल्ली – एचएमडी ग्लोबलने नोकियाच्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने अलीकडे बजेट स्मार्टफोन नोकिया 2 लॉन्च केला. आता अशी माहिती समोर येत आहे की कंपनी नोकिया 1 च्या नावाने एंट्री लेव्हल स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे.
Android Oreo Go सोबत लॉन्च होणार स्वस्त Nokia1 स्मार्टफोन !
Android Oreo Goमध्ये गुगलचे लाइट ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे, जे अधिकृतपणे कंपनीद्वारे लाँच केले आहे. Googleचे हे ऑपरेटींग सिस्टम या स्मार्टफोनसोबत दिले जाऊ शकते. अहवालानुसार, नोकिया 1 उदयोन्मुख स्मार्टफोन बाजारासाठी डिझाइन केला गेला आहे.
ट्विटर यूजर एल्डर मुर्तजिन यांनी ट्विट केले आहे की, नोकिया 1 हा गुगलच्या Android Oreo (GO Edition) चा भाग असेल. अहवालानुसार, या एंट्री लेव्हलच्या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी असेल. या एचडी डिस्प्ले देण्यात येणार आहे आणि असा दावा केला जात आहे की त्याची किंमत ५००० रुपयांच्या आत असेल.