चला भेटूया… मून वॉक करून ट्राफिक कंट्रोल करणाऱ्या पोलीसदादाला


नवी दिल्ली: मोठमोठ्या शहरांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक, वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणे खुप कठीण काम आहे. परंतु मध्य प्रदेशातील इंदौर वाहतूक पोलीस दलातील रणजितसिंह हे नृत्य कौशल्याद्वारे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करतात. इंदूरमधील वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांचे खूप योगदान आहे. जेव्हा लाल दिव्यात गाडी थांबते तेव्हा पहिल्यांदा रणजित यांच्यावर लोकांच्या नजरा असतात. कारण ते मून वॉक करून रहदारी नियंत्रित करतात.

रंजीत सिंह सांगतात, मी मायकेल जॅक्सनचा मोठा चाहता असून गेल्या १२ वर्षांपासून मी त्याच्या मून वॉकची नक्कल करत आहे. रंजीत सिंह सोशल मीडियावर इतके प्रसिद्ध झाले आहेत कि आता लोक त्यांना फॉलो करतात. त्यांचे आतापर्यंत ५० फॉलोअर्स झाले आहेत. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रंजीत सिंह म्हणतात की, बरीच भारतीय विद्यापीठे त्यांच्या या शैलीचा अभ्यास करत आहेत की ते खरोखरच आपल्या नृत्याने वाहतूक नियंत्रित करतात का?

रणजित सिंह यांची सर्वात मोठ्या दुःखाची बाब म्हणजे रश ड्रायव्हिंग आहे. ते म्हणतात, मी आतापर्यंत रस्ते अपघातात मरण पावलेल्या ४० युवकांचा मृतदेह उचलला आहे. मला फार वाईट वाटते. मला असे वाटते कि तरुणाईणे सावध राहून नियमाचे पालन करायला हवे.

आता ते आपल्या सहका-यांना मून वॉकचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा पाहिले कि त्यांच्या या ट्रिकमुळे लोकांचे ध्यान त्यांच्याकडे होते आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होते. त्यामुळे त्यांचे सहकारीदेखील आता मूनवॉक शिकू इच्छित आहे. ते म्हणतात, माझ्या पालकांना माझ्याबद्दल अभिमान वाटतो. कारण त्यांना माझ्या कर्तव्यनिष्ठेवर भरोसा आणि मी वेगळ्या शैलीत करत असलेल्या कामाबद्दल. ज्यात मायकल जॅक्सनच्या मून वॉकचा देखील समावेश आहे.

Leave a Comment