न्यू ईअर पार्टीचा नवा फंडा- वेल्वेट लिपस्टिक


देशभरात नवीन वर्ष स्वागताची व जुन्या वर्षाच्या निरोपाची तयारी जोरात सुरू असून ठिकठिकाणी या निमित्ताने पार्ट्यांचे आयेाजन केले जात आहे. न्यू ईअर पार्टीसाठी लेटेस्ट फॅशन ट्रेंड वेलवेटचा असून या कापडापासून बनलेले फॅशनेबल कपडे चांगलेच डिमांडमध्ये आहेत. त्या सोबतच यंदा वेलवेट लिपआर्टही जोरात असून मेकअप आर्टिस्ट या कलेने तरूणींच्या सौदर्याला चार चाँद लावताना दिसत आहेत.

विशेष म्हणेज वेलवेट लिपस्टिक साठी फार कांही वेगळे करण्याची गरज नाही. आपल्या आवडीच्या रंगाची लिपस्टीक लावून बेस तयार केला की त्यावर फाईन ब्रशच्या सहाय्याने वेगवेगळ्या कलर्सचे स्ट्रोक मारले की झाले काम. अर्थात लिपस्टीकला वेलवेट टेक्चर आणण्यासाठी ब्राईट कलर्स अधिक चांगले. यामुळे ओठांना स्मूथ फिनिश येते व ओठांवर जणू वेल्वेट लावलेय असा भास होतो.

अर्थात हे वेलवेट ओठ खास पार्ट्या, खास ओकेजन्ससाठी अधिक मजा आणतात. मात्र त्यासाठी अगदी मेकअप आर्टिस्ट हवाच असे नाही. घरच्या घरीही ही किमया साधता येते. त्यासाठी तुम्ही घालणार असलेल्या ड्रेसला मॅचिंग लिक्विड लिपस्टीक लावायची व त्यावर कापसाच्या मदतीने त्याच कलरची वेलवेट डस्ट लावायची. ही डस्ट बाजारात तयार मिळते. ती बहुतेक सर्व रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment