हा देश करणार सर्वप्रथम नववर्षाचे स्वागत


जगातील प्रत्येक देशात सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी असून तिथे त्यानुसार सरत्या वर्षाला अलविदा देऊन नववर्षाचे स्वागत केले जाते. प्रत्येक देशाची वेळ पृथ्वीच्या प्रदक्षिणासोबत ठरवली जात असल्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री सगळ्यात आधी कोणता देश नवीन वर्षाचे स्वागत करेल हे आपण जाणून घेऊया.

भारतीय वेळेनुसार आपल्या घड्याळात जेव्हा सायंकाळचे ४.३० वाजतील तेव्हा रात्रीचे १२ तोंगा या देशात वाजलेले असतील. म्हणजेच तोंगा या शहरात जगात सगळ्यात आधी नववर्षाचे स्वागत केली जाईल. हा ओशनिया खंडातील एक छोटासा देश असून त्याचबरोबर सामोआ, ख्रिसमस आइसलँड या देशात सर्वप्रथम नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर आपल्याकडे सायंकाळचे ४.४५ वाजलेले असतील तेव्हा न्यूझीलंडमध्ये नववर्षांचे स्वागत करण्यात येईल.

त्यानंतर आजूबाजूच्या देशात रात्र संपून नववर्षाच्या स्वागताला उधाण येईल. नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार असे देश आपल्या देशाच्या आजूबाजूला आहेत. आपल्या प्रमाणवेळेनुसार हे देश थोडेसे मागेपुढे आहेत. आपल्याकडे जेव्हा ११.३० वाजलेले असतील तेव्हा बांग्लादेशात नववर्षाची धूम सुरू होईल. त्यानंतर पावणेबाराच्या दरम्यान नेपाळमध्ये आणि त्यानंतर आपल्या देशात नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात येईल.

Leave a Comment