‘बिटकॉइन’ला वर्षअखेरीस उतरतीकळा


नवी दिल्ली – वर्षअखेरीस मोठय़ा प्रमाणावर भारतासह जगात सनसनाटी निर्माण केलेल्या बिटकॉईन या पर्यायी चलनाची घसरण होईल अशी चिन्हे आहेत. तर त्याची उगवत्या वर्षात आणखी कोंडी होऊ शकते, असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. या चलनाच्या किमतीत गेले पंधरा दिवस सातत्याने घसरण होत असल्यामुळे त्यात गुंतवणूक केलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

या चलनाची किंमत मंगळवारी १० हजार ४०० डॉलर्स होती. नंतर काही प्रमाणात ती स्थिर होऊन वाढूही लागली होती. बहुतेक सर्व पर्यायी चलनांच्या संदर्भात असे नेहमी घडते. त्यांची किंमत काही सत्रांमध्ये घसरते आणि त्यानंतर पुन्हा वधारते. तथापि, बिटकॉईनच्या संदर्भात वधारापेक्षा घसरणीची शक्यता अधिक आहे. सावधपणे या चलनात गुंतवणूक करावी, असा इशारा शेअरबाजाराची संबंधित संस्थांनी यापूर्वी दिला आहे.

सध्या बिटकॉईनची घसरण होत असली तरी त्याच स्वरूपाची इथेरियम आणि कार्डानो या चलनांच्या किमतींमध्ये मात्र वधार दिसून आल्यामुळे सर्वच पर्यायी चलनांसमोर संकट उभे नाही, हे दिसून आले. मात्र, भारतात बिटकॉईन हे चलन अधिक लोकप्रिय असल्याने त्यात गुंतवणूक जास्त आहे.

Leave a Comment