नवे वर्ष सुरू होण्यास अजून कांही दिवस बाकी असतानाच नव्या वर्षात येणारा सॅमसंगचा गॅलॅक्सी जे टू हा स्मार्टफोन रशियन ई कॉमर्स नेटकॉमपॅक्ट डॉट आरयू वर लिक झाला असून तो ब्लॅक व गोल्ड रंगात ऑक्शनवर लिस्ट झाला आहे. या फोनची किंमत ८८६० रूपये असून तो कंपनीकडून अद्यापी अधिकृत लाँच झालेला नाही. तरीही या साईटवर हा फोन लवकरच विक्रीसाठी येत असल्याची माहिती दिली गेली आहे.
अन्य फिचर्समध्ये या फोनला ५ इंची फुल एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले, १.५ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डने ती वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, दोन्ही एलईडी फ्लॅशसह दिले गेले आहेत. हा फोर जी फोन असून वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी अशी कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स दिली गेली आहेत. फोनला २६०० एमएमएच ची बॅटरी दिली गेली आहे.