पाचशे व दोनशे रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता पाच रूपयांच्या नव्या नोटाही लवकरच बाजारात येत आहेत. सध्या चलनात पाच रूपयांची नाणी अधिक आहेत व ज्या नोटा आहेत त्या फारच जीर्ण स्वरूपात आहेत. नव्या नोटा देवासच्या बीएनपी मध्या छापल्या गेलेल्या असून त्यांची छपाई २००८-०९ सालातच झालेली आहे. ३० ते ४० लाख रूपये किमतीच्या अशा नोटा छापून तयार होत्या त्यांची कटिंग आता पूर्ण झाली असून त्या लवकरच रिझर्व्ह बँकेकडे सोपविल्या जाणार असल्याचे समजते.
पाच रूपयांची नवी नोट लवकरच
सध्या या प्रेसमध्ये दोनशे रूपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात होते आहे. १० रूपयांच्या नव्या नोटाही छपाईसाठी तयार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकारी प्रेसमध्ये नोटांचा स्टॉक नेहमीच छापून तयार असतो व गरजेनुसार या नोटा चलनात आणल्या जातात. सरकारने चलनात कमी किमतीच्या नोटा आणण्यास प्राधान्य दिले असल्याने आता पाच रूपयांबरोबरच दहा रूपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या जाणार असल्याचे समजते.