अंडरवर्ल्ड डॉन दाऊद बायकोच्या ताटाखालचे मांजर


जगभंरात ज्याची दहशत आहे, तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुणाला घाबरत असेल अशी शंकाही येणार नाही. पण अंदरकी बात अशी आहे की हा टेरर गुंड एका व्यक्तीला घाबरून असतो व ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची बायको जुबिना उर्फ महजबी ही आहे. दाऊदच्या काल म्हणजे २७ डिसेंबरला साजर्‍या झालेल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त ही इंटरेस्टींग माहिती बाहेर आली आहे.

दाऊदच्या बायकोला अंडरवर्ल्ड महजबी शेख म्हणूनच ओळखते. तिच्याबाबत फारच कमी माहिती आहे. तिचे फोटोही फारसे कुठे दिसलेले नाहीत. ती भेंडीबाजारची राहणारी आहे. दाऊदचे बालपण याच भागात गेले आहे. दाऊदचे काका सलीम काश्मीरी आजही याच भागात राहतात. असे सांगितले जाते की इस्लामाबादेत दाऊद त्याच्या घरात पार्टी करत होता तेव्हा कांही मुली बोलावल्या गेल्या होत्या. इतक्यात महजबी येत असल्याची खबर आली आणि दाऊदच्या तोंडचे पाणी पळाले. त्याने त्वरेने मुलींना परत पाठविले व नोकरांना सांगून घराची सर्व स्वच्छता करून घेतली. येथे पार्टी झाली हे बायकोला कळू नये यासाठी ही व्यवस्था केली गेली.

दाऊद व महजबी यांना दोन मुली व १ मुलगा आहे.

Leave a Comment