ही आहे जगातील सर्वात थंड जागा; जेथे तापमान असते उणे -५६°C


आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात थंड ठिकाणाची माहिती देणार आहोत. या ठिकाणाचे नाव ‘याकूत्स्क’ आहे. हे ठिकाण रशियाच्या दुर्गम भागातील सुदूर येथे असून हिवाळ्यात येथील तापमान सुमारे २ ते ३ अंशाच्या जवळपास असते. त्यामुळे या ठिकाणाचे तापमान उणे ५० डिग्री सेल्सियस खाली येते.

आर्क्टिक रेषाच्या दक्षिणेस ४५० किलोमीटर अंतरावर रशियात हे शहर लेना नदीच्या काठावर स्थित आहे. म्हणूनच त्याला ‘पोर्ट सिटी’ देखील म्हटले जाते. याकुत्स्कची लोकसंख्या सुमारे २,५०,००० आहे. या शहराची स्थापना १६३२मध्ये झाली होती. पण १८८० आणि १८९०मध्ये सापडलेल्या सोन्या व खनिज संपत्तीमुळे हे शहर लोकप्रिय झाले.

असे सांगितले जाते कि हे क्षेत्र सखा प्रजासत्ताक मुळचे याकूत तुर्क लोकांची मूळ मार्तुभूमी आहे. ते १३ व्या व १४ व्या शतकात बैकल लेक किनारपट्टीहून येथे वास्तव्यास आले होते. १६३२साली रशियन राज्य विस्तारानंतर या येथे देखील नागरी वस्ती वसली आणि या प्यॉतर बेकातोव्हने येथे किल्ल्याचे बांधकाम केले.

यानंतर १८८०-१८९०च्या कालावधीत या प्रदेशातून सोने व इतर खनिज बाहेर पडले. मग ही वसाहत वेगाने वाढू लागली. सोवियेत संघात त्या दरम्यान सोव्हिएतचे हुकूमशहा जोसेफ स्टालिन यांना खनिज आणि सोन्याचा साथ सापडला असल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी येथे स्वतः खाणी खोदल्या.

येथे सहसा १२ मे ते २० सप्टेंबर पर्यंत उन्हाळा असतो आणि या काळात सरासरी तापमान १२ डिग्री सेल्सियस असते. १७ जुलै हा येथे सर्वात उष्ण दिवस असतो. येथे १८ नोव्हेंबरपासून हिवाळा सुरू होतो आणि १ मार्चपर्यंत सुरू राहतो. या दरम्यान, सरासरी तापमान -२३ डिग्री सेल्सियस असते. १३ जानेवारी हा येथील सर्वात थंड दिवस आहे. या दिवसाचे जास्तीत जास्त तापमान -३६ डिग्री सेल्सियस आणि किमान -४१ डिग्री सेल्सियस असते. ब-याचदा तापमान -५६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते.

Leave a Comment