नवी दिल्ली – मोबाईल उत्पादक कंपनी डिटेलच्या सोबतीने सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने एक नवीन फिचर फोन बाजारात आणला असून केवळ ४९९ रुपयांमध्ये हा फोन मिळणार असून या फोनवर बीएसएनएल १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर देणार आहे.
बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या फोनसोबत बोला वर्षभर मोफत !
३४६ रुपये ऐवढी या फोनची मूळ किंमत असून बीएसएनएलने यासोबत बंपर ऑफर दिली आहे. त्यामुळे हा फोन ४९९ रुपयात मिळणार आहे. जयपूरमध्ये या फोनची घोषणा करण्यात आली. बीएसएनएलने यावर कोणत्याही डाटा ऑफर दिलेली नाही. बीएसएनएलकडून देण्यात आलेल्या ऑफरची किंमत आहे १५३ रुपये तर फिचर फोनची किंमत ३४६ रुपये आहे. या ऑफरमध्ये वर्षभर बीएसएनएल टू बीएसएनएल १५ पैसे प्रति मिनिट दर आकारला जाईल तर बीएसएनएल टू अन्य नेटवर्कवर ४० पैसे प्रति मिनिट दर आकारला जाणार आहे. या फिचर फोनला १.४४ इंच असलेला मोनोक्रोम डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जीएसएम २जी नेटवर्कवर काम करतो. यामध्ये केवळ एकच सिम वापरता येणार असून ६५०mAh क्षमता असलेली बॅटरी फोनला देण्यात आली आहे.