२५१ मुलींचे या हिऱ्या व्यापाऱ्याने लावून दिले लग्न


नवी दिल्ली: गुजरातच्या सुरत येथील हिरे व्यापारी महेश सवानी दरवर्षी दिवाळीसाठी आपल्या कर्मचा-यांना बोनस आणि कार देण्याकरिता प्रसिद्ध आहेत. पण यावेळी आपण असे काहीतरी केले आहे ज्यामुळे आपल्याला धक्का बसेल. महेश सवानी यांनी रविवारी २५१ मुलींची लग्न लावून दिली. ज्यामध्ये ५ मुस्लिम आणि १ ख्रिस्ती मुलींचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण रीतिरिवाजांसह त्यांचे लग्न लावून दिले. यापैकी दोन मुली एचआयव्ही पॉजिटिव्ह आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महेश सवानी अशा मुलींची लग्न लावून देतात ज्यांचे वडील नाहीत किंवा लग्न खर्च ज्यांना परवडू शकत नाही. ते म्हणाले, या मुलींचे वडील बनण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे. २०१२पासून ते दरवर्षी कन्यादान करतात. हजारो लोक यावेळी उपस्थित होते. यामध्ये मुलगा व मुलीचे नातेवाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते. महेश सवानी वधूंना सोफा, पलंग आणि बाकी घर सामना देतात. त्यामुळे ते त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरु करू शकतील.

Leave a Comment