टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी


न्यूयॉर्क : आपल्यामधील कित्येकजणांना शुगर असल्यामुळे रोज इन्सुलिन घ्यावे लागत असेल, तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आणली आहे. संशोधकांनी शोधून काढलेला पॅच हातावर ठेवला, तर आठवड्याभरासाठी तुमची या इन्सुलिनपासून सुटका होऊ शकते.

एक त्वचेचा तुकडा अमेरिकेतील वॉशिंग्टनमधल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला असून तुमच्या शरीरावर हा त्वचेचा पॅच ठेवला, की तुम्हाला आठ दिवस तरी इन्सुलिन घेण्याची आवश्यकता लागणार आही. हा लाभ टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णांना मिळणार आहे.

रोजची इन्सुलिनची अनेक मधुमेही रुग्णांसाठी ही कटकट असते. त्यामुळे होणाऱ्या वेदना हा अनेकांसाठी नित्याचा भाग झाला आहे. पण काहीसा दिलासा या स्कीन पॅचमुळे मिळणार आहे. कारण त्वचेवर हा पॅच लावताना इंजेक्शनपेक्षा कमी वेदना होतात. इन्सुलिनची गरज या पॅचच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. त्यामुळे ज्या पेशन्ट्सना इन्सुलिन घेऊन साखरेचे प्रमाण कमी-जास्त करावे लागते, त्यांना दिलासा मिळणार आहे. हा शोध अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग आणि बायोइंजिनियरिंगमधील शास्त्रज्ञांनी लावला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment