भडक जीवनशैली आणि उद्धटपणामुळे माल्ल्याचा बळी – गोपीनाथ


नवी दिल्ली – एअर डेक्कन या विमान कंपनीचे अध्यक्ष जी आर गोपीनाथ यांनी किंगफिशर विमान कंपनीचे विजय माल्ल्या हे कोणत्या राजकीय षडयंत्राचे नव्हे तर आपल्या भडक जीवनशैली आणि उद्धटपणाचे बळी ठरले असल्याचे मत व्यक्त केले. कर्जबुडव्यांचे माल्ल्या हे आता पोस्टर बॉय असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

गोपीनाथ यांनी वर्ष २००७ साली एअर डेक्कन कंपनी माल्ल्या यांना १ हजार कोटी रूपयांना विकली होती. हा सौदा ज्यावेळी झाला, हवाई क्षेत्राचा विस्तार त्यावेळी होत होता. गोपीनाथ पुढे म्हणाले, कोणत्याही राजकीय षडयंत्राचे माल्ल्या हे बळी ठरलेले नाहीत. त्यांना हे दिवस त्यांच्या भडक जीवनशैली आणि उद्धटपणामुळे पाहावे लागत आहेत.

आपल्या भडक व आलीशान जीवनशैलीमुळे ते एकेकाळी चर्चेत होते. फॉर्म्युला वन शर्यतीत रस, त्याचबरोबर भडक कॅलेंडर काढण्यामुळे चर्चेत असलेले माल्ल्या हे आता कर्जबुडव्यांसाठी उदाहरण ठरले आहेत. गोपीनाथ कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नाव न घेता म्हणाले की, एका पक्षाने माल्ल्यांना देश सोडून जाण्यासाठी परवानगी दिली. तर योग्य ते पाऊल दुसऱ्या पक्षाने न उचलल्यामुळे माल्ल्या पळून गेल्याचा दोष त्या पक्षावर ठेवला.

Leave a Comment