डावखुरी व्यक्ती नास्तिक असण्याची शक्यता जास्त : सर्वेक्षण


लंडन : डावखुरी व्यक्ती नास्तिक असण्याची शक्यता जास्त असते, असे एका सर्वेक्षणात समोर आले असून यासंदर्भातील सर्वेक्षण रिव्हॉल्युशनरी सायकॉलॉजिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.

या केलेल्या सर्वेक्षणानुसार, डाव्या हाताने काम करणारी अधिकाधिक माणसे देवावर विश्वास ठेवत नाही. आधुनिक युगातील लोकांचा आधीपेक्षा जास्त देवावर विश्वास असल्याचेही यात समोर आले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, डाव्या हातांनी काम करणारे लोक आणि आत्मकेंद्रित लोकांच्या संशोधकांनी मुलाखती घेतल्या आणि त्यांचे सर्वेक्षण केले. ते किती प्रमाणात धार्मिक आहेत, याचे अंदाज त्यांचा अभ्यास करुन बांधले. फिनलँडमधील औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिकीकरणाच्या पूर्वीच्या काळात धर्माकडची ओढ ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात होती. अर्थात, विशिष्ट संख्येच्या लोकांचा अभ्यास करुन, प्रातिनिधिक स्वरुपात हे सर्वेक्षण औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांनी केले आहे.

Leave a Comment