९८ व्या वर्षी पदव्युत्तर पदवीधर झाले आजोबा


पाटना – शिकण्याला वयाचे बंधन नसते असे आपल्याकडे म्हटले जाते, पण ज्याने कोणी म्हटले आहे त्यांनी काही खोटे म्हटलेले नाही. याचा प्रत्यय नुकताच बिहारमधील नालंदा मुक्त विद्यापीठात आला. येथील एका आजोबांनी वयाच्या ९८ व्या वर्षी कला या शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

या आजोबांचे नाव राज कुमार असे असून आपल्या वयाच्या ९८ व्या वर्षी या आजोबांनी अर्थशास्त्र या विषयात नालंदा मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यांना ही पदवी नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान सोहळ्यात बहाल करण्यात आली. तुम्ही सध्याच्या तरुणाईला काय संदेश द्याल, या प्रश्नावर आजोबांनी म्हटले कि कायम प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

Leave a Comment