स्नोडेनचे हेवन अॅप करेल युजरसाठी हेरगिरी


अमेरिकेची रक्षा गुपिते चव्हाट्यावर आणणारा एडवर्ड स्नोडेन याने स्मार्टफोन युजर्ससाठी हेवन नावाचे अॅप बाजारात आणले आहे. हे अॅप वापरणार्‍या युजरचा फोन कधीच हॅक होऊ शकणार नाहीच पण शिवाय युजरचा फोन त्याच्यासाठी गुप्तहेराची कामगिरीही बजावेल असा त्याचा दावा आहे. यामुळे युजरला स्मार्टफोनसाठी सर्वाधिक सुरक्षा मिळणार आहे. हे अॅप स्मार्टफोनच्या सुरक्षा यंत्रणेतच बदल करते असेही समजते.

या अॅपचे डिझाईन गार्डियन प्रोजेक्ट संस्थेने केले आहे. स्नोडेन अमेरिकेला त्याच्या हेरगिरीसाठी हवा असून त्याने गेले कित्येक दिवस रशियात आश्रय घेतला आहे. तेथे तो फ्रिडम ऑफ द प्रेस फौंडेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या हेवन अॅपमुळे स्मार्टफोन युजरला त्यांच्या प्रायव्हसीबरोबर कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. या अॅपमळे स्मार्टफोन मधील कॅमेरा, मायक्रोफोनसह सर्व सेन्सर्स अॅक्टीव्ह होतात व यामुळे तुमचा स्मार्टफोन हेरगिरी करू शकतो. म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या फोनला कुणी हात लावला काय, तुमच्या खोलीत कुणी येऊन गेले का ही सर्व माहिती मिळू शकते. पत्रकार, मानवाधिकार संरक्षक या व अशा संवेदनशील क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हे उपकरण फारच उपयुक्त असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment