अवघ्या ८१ वयाची फ्लाईट अटेंडंट


विमान प्रवासात हवाई सुंदरी किवा फ्लाईट अटेंडंड हा खास अटेंशनचा विषय बनतो. अमेरिकेत नियमानुसार विमानाचे पायलट ६५ वर्षांपर्यंतच काम करू शकतात मात्र फ्लाईट अटेंडंट साठी अशी कोणतीही वयोमर्यादा नाही. त्यामुळेच तेथे आजही गेली ६० वर्षे ही जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत असलेली बेटी नॅश ही अवघी ८१ वर्षांची हवाई सुंदरी आजही तितकयात उत्साहाने काम करते आहे. यामुळे ती जगातील सर्वात सिनिअर फ्लाईट अटेंडंड बनली आहे.

वॉशिंग्टनच्या सीमेवरील व्हर्जिनिया येथील रहिवासी असलेली बेटी २१ वर्षाची असतानाच या कामावर रूजू झाली. १० वर्षांपूर्वीच तिच्या सेवेची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान केला गेला. आजही विमानातील प्रवासी तिच्या वयाची दखल घेऊन तिच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक करतात व अनेकजण तिच्यासोबत सेल्फीही काढतात. क्रू मेंबर्सच्या म्हणण्याप्रमाणे बेटी त्या सर्वांची प्रेरणा आहे. बेटीला बहुतेक सगळे अ्रोळखतात व त्यांच्या मताप्रमाणे ती कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. निवृत्तीबाबत बेटीला विचारले असता ती सांगते वयाच्या ९० पर्यंत मी नक्कीच काम करणार नाही मात्र निवृत्तीचे म्हणाल तर तिने अजून त्याबाबत विचार केलेला नाही. ३१ डिसेंबरला बेटी तिचा ९० वा वाढदिवस साजरा करते आहे.

Leave a Comment