व्होल्व्हो फक्त इलेक्ट्रीक कार्सच बनविणार


स्वीडनची ऑटो कंपनी व्होल्व्होने भारतात लग्झरी कार उद्योगावर वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली असून जर्मनीच्या कार कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची तयारी सुरू केली आहे. २०१९ पासून कंपनी फक्त अत्याधुनिक इलेक्ट्रीक कार्स तयार करणार आहे व त्यांनी जर्मनीच्या मर्सिडीज, ऑडी व बीएमडब्ल्यूला स्पर्धा करण्याच्या मनोदय जाहीर केला आहे.

व्होल्व्हो ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्ल्स फ्रंप या संदर्भात म्हणाले, पुढच्या दशकात नव्या वाहनांपैकी ४० टक्के वाहने इलेक्ट्रीक करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. त्याला अनुसरून आम्ही आमची धोरणे ठरवित आहोत.२०१९ पासून आमची प्रत्येक नवी कार इलेक्ट्रीफाईड असेल. मग ती हायब्रीड असो, प्लग इन हायब्रीड असो, माईल्ड हायब्रीड असो वा फुल इलेक्ट्रीक असो. २०२५ पर्यंत जगभरात १० लाख इलेक्ट्रीक कार विक्रीची उदिष्ट कंपनीने ठेवले आहे. या कार्सच्या किमती स्पर्धात्मक असतील.त्यासाठी स्थानिक व्हेंडर्सबेस विकसित केला जात आहे. या वर्षी कंपनीने भारतात असेंबल केलेली एक्ससी ९० कार बाजारात आणली आहे.

Leave a Comment