या मोबाईलवर व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरनंतर बंद होणार!


मुंबई : या वर्षाअखेर काही फोनवर व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार असून कंपनीने एका ब्लॉगद्वारे आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे ३१ डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचे असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.

ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, विंडोज फोन ८.० आणि जुन्या व्हर्जनचा या फोनमध्ये समावेश आहे, व्हॉट्सअॅप ज्यामध्ये सपोर्ट करणार नाही. व्हॉट्सअॅप आऊटडेटेड व्हर्जनला सपोर्ट करणार नसल्याचे यापूर्वी २०१६मध्येही कंपनीने जाहीर केले होते. पण ती डेडलाईन नंतर ३० जून २०१७ पर्यंत वाढवण्यात आली होती आणि पुन्हा एकदा वाढवून देण्यात आलेली मुदत ३१ डिसेंबर संपणार आहे. कंपनीसाठी हा निर्णय कठोर आहे. पण व्हॉट्सअॅपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट देणे गरजेचे असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तुम्ही हे फोन वापरत असाल तर लवकरात लवकर अपडेटेड व्हर्जनचे फोन घ्या, असेही व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment