या आहेत २०१७तील फेक न्यूज; ज्यावर केला आपण विश्वास


नवी दिल्ली: २०१७मध्ये देशभरात फेक न्यूजबाबत खूप चर्चा झाली. अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात सोशल मीडियाचे सर्वाधिक योगदान आहे. या प्रमुख यूकेस्थित शब्दकोश कंपनीला आढळून आले की गेल्या १२ महिन्यांत या शब्दाचा वापर ३६५% वाढला आहे. २०१७मधील अशाच काही फेक बातम्यांवर आपण एक नजर टाकूया, ज्यावर देशातील सामान्य जनतेने विश्वास ठेवला. आकाश अंबानींचा विवाह कार्ड अत्यंत व्हायरल आहे, तर पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलच्या मृत्यूच्या बातमीने प्रत्येकाला धक्का बसला. पण अखेरीस हे वृत्त खोटे सिद्ध झाले. अशाच काही फेक न्यूजवर नजर टाकू या…

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानींचे वेडिंग कार्ड
एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्या लग्नपत्रिकेला मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची असल्याचे सांगितले जात होते. आकाश हा मुकेश आणि नीता अंबानी यांचा थोरला मुलगा आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर ही बातमी फेक असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सांगण्यात आले.

एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी केल्या ५० सर्जरी
सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. ज्यात असे सांगण्यात आले की १९ वर्षीय सहर तबर एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी ५० शस्त्रक्रिया केल्या. फोटो व्हायरल झाल्यानंतर, सहरने स्वतः ही बातमी फेक असल्याचे सांगितले. तिने सांगितले की फोटोशॉपद्वारे तिने स्वत: फोटो एडीट केला आणि तो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.

पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या मृत्यूची बातमी
सोशल मीडियावर लाहोरमध्ये उमर अकमलचे निधनाची खोटी बातमी पसरली होती. यानंतर त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. त्यानंतर ही बातमी जगभर व्हायरल झाली. त्यासोबतच एक फोटो देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये उमर अकमलसारखा दिसणारा एक माणूस रुग्णालयात असल्याचे दाखवण्यात आले होते. उमर अकमलने जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा त्याने सोशल मीडियावर ट्विट व व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की ही बातमी खोटी असून मी पूर्णपणे सुरक्षित आहे. उमर ट्विट केले होते कि, मी लाहोरमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे, सोशल मीडियावर व्हायरल न्यूज चुकीची आहे. आणि इनशा अल्लाह मी राष्ट्रीय टी -२० स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये खेळणार आहे.

दिवाळीत भारताचा अंतराळतून घेतलेला फोटो
दरवर्षी इंटरनेट आणि व्हाट्सएप दीपावलीनंतर एक फोटो खूपच व्हायरल होत असतो. लोक एकमेकांना दिवाळीच्या दिवशी भारताचा अंतराळातून घेतलेला फोटो पाठवतात. असा दावा केला गेला आहे की नासाने हा फोटो घेतला आहे. या छायाचित्रांत दीपावलीच्या दिवशी भारतीय परिदृश्य प्रकाशमय होतो. पण ही बातमी पूर्णपणे फेक निघाली.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमाचा व्हिडिओ
सोशल मीडियावरील दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये दाखवण्यात आले होते की ते ‘beginning’ शब्द योग्यपणे बोलू शकत नाहीत. सर्वत्र त्यांची थट्टा केली जात होती. पण त्याच्या मागे दुसरे काहीतरी सत्य आहे. वास्तविक व्हिडिओमध्ये ते सहजपणे ‘beginning’ हा शब्द बोलत आहेत. सत्य हे आहे की या व्हिडिओमध्ये छेडछाड करून प्रसारित करण्यात आले होते. यानंतर लोकांनी या व्हिडिओला सत्य म्हणून स्वीकारले.

मुलांचे संरक्षण करण्यासाठी सिंहांनी हरणाला वेढले
सोशल मीडियावर हा फोटोदेखील अतिशय व्हायरल झाला होता. असे म्हटले गेले होते की मुलाला वाचविण्यासाठी, हरणांने स्वतःचे बलिदान दिले. असे देखील म्हटले जात कि ज्याने हा फोटो टिपला तो फोटोग्राफर त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला. पण ही बातमी देखील फेक निघाली. यामागे सत्य असे आहे की हे हरीण सिंहांना घाबरले होते.

२००ची नोट झाली होती व्हायरल
नोट बंदीनंतर आरबीआयने ५०० आणि २००० च्या नवीन नोटा जारी केल्या त्यानंतर २०० रुपयांची नवीन नोटही येत आहे. त्यानंतर २००रुपयाच्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ही बातमीदेखील फेक निघाली.

Leave a Comment