राजकीय पुढाऱ्यांचे बॉडीगार्ड का लावतात गॉगल ?


आपण नेहमीच बघत आलो आहे महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांचे बॉडीगार्ड काळा गॉगल घालून असतात. त्यावेळी अनेकांना हा प्रश्न पडतो, पंतप्रधानांच्या आजूबाजूला असलेले एसपीजीचे गार्डदेखील गॉगल घालून दिसतात.

पण या बॉडीगार्डच्या गॉगल लावण्यामागे देखील अनेक कारणे आहेत, त्यात महत्वाचे कारण म्हणजे त्यांची नजर नेमकी कुठे आणि कुणावर आहे, हे सहजासहजी कळू नये, तसेच त्यांना एखाद्या संशयितावर करडी नजर ठेवणे सोप जात असते. पुन्हा पुन्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर तो सावध होतो. पण काळ्या गॉगलमुळे संशयिताला कळतच नाही, कि त्या बॉडीगार्डची नजर आपल्यावर आहे. तसेच एसपीजीसारख्या सुरक्षा यंत्रणांसाठी ट्रेनिंग घेतलेले हे जवान, कुणाकडे पाहत आहेत, हे सहजासहजी कळत नाही.

एसपीजी सुरक्षा पंतप्रधान, राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांच्या घरातील महत्वाच्या व्यक्तींना दिली जाते. एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रम, सभा या ठिकाणी उन्हात दूरपर्यंत नजर ठेवण्यात सोपे जावे, म्हणून हे बॉडीगार्ड गॉगल लावतात.