बंगलोर बनले स्वतःचा लोगो असलेले पहिले शहर


आयटीचे शहर अशी ओळख असलेल्या बंगलोरला आता स्वतःचा लोगो मिळाला असून ब्रँड ओळख मिळालेले बंगलोर हे देशातील पहिले शहर बनले आहे. न्यूयॉर्क , पॅरिस, मँचेस्टर या शहरांनीही या पूर्वीच त्यांचे स्वतःचे लोगो बनविले आहेत. या यादीत आता बंगलोरचाही समावेश झाला आहे. रविवारी शहराचा नवा लोगो हब्बा स्ट्रीट फेस्टीव्हलमध्ये जारी करण्यात आला.

ब्रँड नेम व लोगोमुळे शहराच्या सकारात्मक भावनेची ओळख होते असे पर्यटन मंत्री प्रियंका खडगे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या लोगो शहराच्या तसेच येथील नागरिकांच्या भावना दर्शवितो. शहराची संस्कृती, शहराचा रंग आणि शहराचा फ्लेवर यांचा शहर भावनांमध्ये समावेश करता येईल. या शहरात परंपरा आणि मॉर्डन संस्कृती हातात हात घालून एकरूप झाल्या आहेत. नव्या लोगोमुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल व गुंतवणुकीसाठीही लोगो उपयुक्त ठरेल असेही खडगे यांनी सांगितले.

Leave a Comment