वन प्लसने त्यांच्या टी ५ चा नवा अवतार लाँच केला आहे. स्टार वॉर्स हा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन कंपनीने ८ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सह ३८९९९ रूपयांत बाजारात आणला आहे. खास सँडस्टेान व्हाईट कलरमध्ये हा फोन सादर केला गेला असून त्याच्या बॅकसाईडवर स्टार वॉर्स लोगोही आहे. त्याचबरोबर फोनसोबत स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन सॉलीड बॅककव्हरही दिले जाणार आहे.
वनप्लसचा स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन फोन लाँच
या फोनसाठी ६.०१ इंची एचडी ऑप्टीक अमोलेड डिस्प्ले २.५ डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. स्नॅपड्रगन ८३५ प्रोसेसर, अँड्राईड नगेट ७.१.१ ओएस, ड्युअल कॅमेरा सेटअप, त्यात प्रायमरी कॅमेरा १६ एमपीचा तर सेकंडरी कॅमेरा २० एमपीचा असून ड्युल एलईडी फ्लॅशही दिला गेला आहे. किवक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त ३३०० एमएएच ची बॅटरीही फोनसाठी दिली गेली आहे.