ई कॉमर्स कंपन्यांनी त्यांचा बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी तसेच वेगाने वाढीसाठी ऑफलाईन्स स्टोअर्सना प्राधान्य देण्याची निती अवलंबिली असून या कंपन्या देशात अनेक रिटेल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहेत. नव्या वर्षात अनेक कंपन्यांची रिटेल स्टोर्स देशात सुरू केली जात असून त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली जात आहे. ऑनलाईन फनिचर पेपर फ्राय, फॅशन क्षेत्रातील मिंत्रा, लहान मुलांच्या वस्तू विकणारे फर्स्ट क्राय डॉट कॉम या कंपन्यांनी त्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
ई कॉमर्स कंपन्यांचे ऑफलाईन स्टोअर्सना प्राधान्य
ऑफ लाईन स्टोअर्समध्ये वेगाने बाजार हस्तगत करणे हा मुख्य उद्देश आहेच पण पुढच्या वर्षात अनेक कंपन्या त्यांचे आयपीओही बाजारात आणत आहेत. त्यासाठीही रिटेल दुकानांवर फोकस केला जात असल्याचे बाजारतज्ञांचे म्हणणे आहे.२०१७ मध्ये या ई कॉमर्स कंपन्यांच्या बाजार हिश्श्यात २५ टक्के वाढ होऊन त्यांची उलाढाल २० अब्ज डॉलर्सवर गेली होती. येत्या ४-५ वर्षात रिटेल सेक्टरमध्ये ३० ते ३५ टक्के वाढ अपेक्षित आहे. असोचेम व डेलाईट च्या अहवालात २०१८ मध्ये ही उलाढाल ३.२ लाख कोटींवर जाईल असा अंदाज वर्तविला गेला आहे.