आज काय सांगत आहे गुगलचे डुडल


नाताळाचा सण जगभरात आज ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात साजरा करत असून यावेळी गुगलने ‘December Global Festivities’ हे डुडल प्रकाशित केले आहे. तसे बघायला गेले तर वर्षभर काहीना काही सण आपल्याकडे सुरू असतात. आपल्याला तेव्हा भरपूर सुट्ट्या असतात. पण नाताळातच मोठी सुट्टी पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी असते. तेव्हा बाहेर कुठेतरी फिरायला जाणे, नाताळ आपल्या मित्रपरिवारासोबत साजरा करणे असे अनेक नियोजन असतात आणि गुगलने डुडलमार्फत याच छोट्या मोठ्या आनंदाच्या क्षणाला उजाळा दिला आहे. तेव्हा गुगलचे हे डुडल वर्षातून एकदाच मोठी सुट्टी अनुभवणाऱ्या अनेकांना नक्की आवडेल, यात शंका नाही.

पेंग्विन आणि पोपटाचे कुटुंब गुगलने आपल्या डुडलमधून दाखवले आहे. ‘December Global Festivities’ ची मालिका यासाठी गुगलने तयार केली आहे. आता ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला या मालिकेतील पुढचे डुडल गुगल प्रसिद्ध करणार आहे.

Leave a Comment