व्हिडीओकॉनचा सरकार विरोधात १० हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा


दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्हिडीओकॉनने सरकारच्या विरोधात मोर्चा उघडण्याची तयारी केली आहे. कंपनी सरकारकडून 10 हजार कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्यता आहे. नुकतेच सीबीआय न्यायालयाने 2जी घोटाळ्यातील सर्व आरोपींना मुक्त करण्याचा आदेश दिल्यामुळे कंपनी हे पाऊल उचलणार आहे.

कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी सरकारवर10 हजार कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा करण्याची तयारी करत आहे. सध्या तरी कंपनी 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुले झालेल्या नुकसानीची मोजदाद करत आहे. यात कंपनीला सुमारे 10 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

व्हिडीओकॉनला दूरसंचार सेवा व्यवसायासाठी सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार परवाने रद्द केल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला होता.

सर्वोच्च न्यायालयाने ए. राजा यांच्या कार्यकाळात वाटप झालेले 122 दूरसंचार परवाने 2012 साली रद्द केले होते. या 122 परवान्यांपैकी 15 परवाने व्हिडीओकॉनचेही होते. यासाठी कंपनीने एकूण 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment