
नोंदणी व परवाना कार्यालयाकडून चंदिगड येथे नुकताच वाहनांसाठी स्पेशल नंबर लिलाव करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या या ई लिलावात फनी नंबरसाठी सीएच -०१ बी क्यू सिरीज मधल्या ०००१ या नंबरला सर्वाधिक बोली मिळाली. फॉरबो लाईफस्टाईल लिमिटेड कंपनीचे मालक इंद्र गुप्ता यांनी त्यांच्या मारूती सुझुकी बलेनो या ७ लाख रूपये किंमतीच्या गाडीसाठी हा नंबर मिळवा म्हणून ५ लाख १३ हजार रूपये मोजल्याचे जाहीर करण्यात आले. गुप्ता यांचा आयात व्यवसाय असून त्यांच्याकडे याच नंबरची आणखीही एक गाडी आहे. शौक म्हणून नव्या गाडीसाठी त्यांनी हाच नंबर घेतला असल्याचे समजते.
गाडीइतकीच स्पेशल नंबरसाठी मोजली किंमत
याच सिरीजमधील ०००५ हा नंबर ४ लाखाला टोयोटो फॉर्च्यूनर या गाडीसाठी घेतला गेला असून या गाडीच्या मालकासाठी हा नंबर लकी असून त्याच्याकडे याच नंबरच्या पाच गाड्या आहेत. ०००९ या नंबरसाठी ३ लाख रूपये मोजले गेल्याचेही कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
