जगभरातील हौशी किंवा विकृत लोकांमध्ये शरीरावर गोंदणे म्हणजे टॅटू रेखून घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने यातही वैविध्य किंवा फॅशन कशी आणता येईल यासाठी टॅटू काढणारे अनेक कल्पना लढवित आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथही मिळत आहे. परिणामी आपण कल्पनाही करू शकणार नाही असे टॅटू पाहायला मिळत असून हे टॅटू थ्री डी तंत्रज्ञानामुळे अगदी खरे असावेत असा भास ही होतो आहे.
कपाळावर तिसरा डोळा, शरीरावर बटणे शक्य
टॅटू रेखण्याचे मुख्य कारण हौस आहेच पण त्याचबरोबर आपण आकर्षणाचे केंद्र बनावे हा हेतूही टॅटू काढून घेणार्यांच्या मनात असतोच. थ्री डी तंत्रज्ञानाने काढले जात असलेल्या अत्याधुनिक टॅटूमुळे शरीरच बदलले असल्याचा भास मिर्माण केला जात आहे. या आर्टसाठी खास प्रकारची शाई वापरली जाते व टॅटू आर्टिस्ट तिच्या सहाय्याने शरीरावर अशी चित्रे रेखतात की या आकृत्या शरीरावर आहेतच असा भास होतो. कपाळावर हुबेहूब तिसरा डोळा, शरीरावर शर्टच्या बटणांच्या जागी कातडीवरच बटणे लावल्याचा भास, डोकयावर विटांचे बंाधकाम केल्याचा टॅटू, गुडघ्यावर गुडघा फाटला असावा असा भास निर्माण करणारा टॅटू असे अनेक प्रकारचे टॅटू आर्टिस्ट रेखत आहेत आणि लोकही मोठ्या हौसेने असली कमाल आपल्या शरीरावर गोंदवून घेत आहेत तीही भलीभारी रक्कम मोजून.