स्वदेशी खाद्य पदार्थांमध्ये चिकन बिर्याणी अव्वल; तर पिझ्झा पिछाडीवर


नवी दिल्ली – यावर्षी स्थानिक व आंतराष्ट्रीय खाद्य पदार्थांबाबत भारतात लोकांची भूक वाढली असून बहुतांश लोकांनी यामध्ये स्वदेशी खाद्य पदार्थांविषयी आपली आसक्ती दाखवली आहे. चिकन बिर्याणी सर्वात जास्त ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या पदार्थांच्या यादीत सर्वात अव्वल राहिली.

ऑनलाईन माध्यमाने खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या स्विगी या कंपनीच्या अनुसार, भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चिकन बिर्याणीने आपले स्थान कायम राखले असून स्विगीने हा निष्कर्ष दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, चेन्नई आणि कोलकातामध्ये ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याच्या आधारावर काढला आहे.

त्याचबरोबर स्विगीने असे देखील म्हटले आहे कि, चिकन बिर्याणी व्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या यादीमध्ये पाच प्रसिद्ध खाद्य पदार्थ म्हणजेच मसाला डोसा, बटर नान, तंदूरी चिकन आणि पनीर बटर मसालाने स्थान मिळवले आहे. पिझ्झाला या यादीत स्थान मिळालेले नाही. परंतु पिझ्झा सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये सामील होता. स्विगी कंपनीने सांगितले, की या वर्षी ३ डिसेंबर रोजी त्यांच्या वेबसाईटवरून सर्वात जास्त भोजन ऑर्डर केले गेले.

Leave a Comment