या शहरांत आहेत क्रिकेटपटूंची रेस्टॉरंटस


प्रवासाबरोबरच आपल्याला खाण्यापिण्याचीही आवड असेल तर या शहरांत गेलात तर आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या हॉटेल्स रेस्टॉरंटना जरूर भेट द्या. तडाखेबंद खेळाने आपले मनोरंजन करणार्‍या खेळाडूंची ही रेस्टॉरंटस तुमची रसनाही तृप्त करतील याची १०० टक्के खात्री आहे. थोडक्यात काय पर्यटनाबरोबर आपण आपला खाण्यापिण्याचा शौकही येथे पुरा करू शकाल.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व अभिनेत्री सागरिकाचा पती जहीरखान याने पुण्यात त्याचे पहिले रेस्टॉरंट जेकेएस फाईन डाईन नावाने सुरू केले होते व आता त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चेन रेस्टॉरंटस आहेत. त्याने पुण्यात नुकतेच टॉस या नावाने लाऊंजही सुरू केले आहे. जहीरच्या या रेस्टॉरंटना खाद्यप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बॅटबरोबरच स्वयंपाकावर हात चालविण्यासाठीही फेमस आहे.त्याला स्वतःला कुकींगची आवड आहेच पण तो खाण्याचाही प्रेमी आहे. त्यानेही कांही वर्षांपूर्वीच रेस्टॉरंट व्यवसायात पाय रोवले आहेत. मुंबईत त्याची तेंडुलकर्स व सचिन्स या नावाने दोन रेस्टॉरंट आहेत. सौरव गांगुलीने कोलकाता येथे पार्क स्ट्रीटवर फूड पॅव्हेलियन नावाने रेस्टॉरंट सुरू केले असून येथे काँटिनेंटल पासून अमेरिकन पर्यंत सर्व प्रकारची कुझिन्स मिळतात. रविंद्र जडेजा याने २०१२ साली राजकोट येथे जड्डूज नावाने रेस्टॉरंट सुरू केले असून ते त्याची बहिण पाहते.


भारताचा माजी कप्तान कपिल देव याने २००६ मध्ये चंदिगड येथे कपिल्स इलेव्हन नावाने सुरू केलेले रेस्टॉरंट फारच लोकप्रिय असून त्याच्या आता देशभर शाखा झाल्या आहेत. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने दिल्लीत आर.के पुरम येथे न्यू एवन नावाने सुरू केलेले रेस्टॉरंट अल्पावधीत लोकप्रिय झाले असून येथील सेवा अतिशय उत्तम असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment