२०१७मध्ये घडल्या अशा काही घटना ज्यांनी दाखवले माणुसकी अजूनही जिवंत आहे


नवी दिल्ली: इंटरनेटचा असा अंदाज आहे की २०१७ वर्ष काही विशेष गेले नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, हिंसा, राजकीय आणि आर्थिक संकट ज्यामुळे लोक दुखावले गेले. पण या कठीण काळात काही लोकांना मदत केली आणि ते नायक बनले. २०१७मध्ये अशाच काही गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. ज्यात सिद्ध झाले आहे की जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. त्यांनी आपले जीवन जीव धोक्यात घालून लोकांचे जीवन वाचविले. वाचा या १० गोष्टी ज्या थोड्या प्रेरणादायी आहेत

जेव्हा इन्स्पेक्टरने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा एका ऍम्बुलन्ससाठी थांबवला

बंगळुरूच्या ट्रिनिटी सर्कलमधून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा जात होता. त्यावेळी वाहतूक उपनिरीक्षक एम.एल. निजलिंगप्पा तेथे ड्युटी करत होते. त्यावेळी राष्ट्रपती राजभवनकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले कि राष्ट्रपतींच्या ताफ्यामुळे एक रुग्णवाहिका अडकली आहे. त्या रुग्णवाहिकेला जवळील खाजगी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेला वाट करून दिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी निजलिंगप्पा यांची प्रशंसा केली.

मुंबईतील पुराग्रस्तांना लोकांची मदत

मुंबईत पावसादरम्यान पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक लोकल प्रभावित होतात. मुंबईतील वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा वाजतात. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी गरजूंना मदत केली. लोकांसाठी आपले घर व कार्यालये उघडली होती. गरजूंना मुंबईतील रहिवाशांनी अन्न, पाणी आणि आवश्यक साहित्य दिले. त्याचवेळी एक फ्रेंच कुटुंब पूरामुळे येथे थांबले होते. त्याचवेळी दादरच्या गुरुद्वारामध्ये ७५० लोकांना आश्रय दिला होता.

कर्नाटकातील एक रिक्षाचालक जो रात्री गरजूंना करतो मोफत मदत

कर्नाटकच्या बेळगाव येथे एक रिक्षा चालक, जो रात्रीच्या वेळी गरजूंच्या मदतीसाठी मोफत रिक्षा सेवा देतो. एवढेच नाहीतर तो आपल्या कमाईतील काही भाग स्वयंसेवी संस्थांमध्ये दान देखील करतो.

हाताने टायर पकडून पुलावरून खाली येणारी कार वाचली

यॉर्कशायर पोलिस ऑफिसर मार्टिक विलिसने महामार्गावर दुर्घटनाग्रस्त कारला पुलावरून खाली कोसळणाऱ्या कार पकडून त्यातील लोकांचे आयुष्य वाचवले. तब्बल १५ मिनिटे मार्टिनने कारला पकडून ठेवले होते. एवढेच नाही तर त्याने ड्रायव्हरचा देखील जीव वाचवला.

पुरामुळे फसलेल्या कारमध्ये अडकलेल्या माणसाला वाचवण्याकरता मानव निर्मित साखळी

टेक्सासमधील हुर्रीकेन हार्वेमध्ये एक कार पाण्यात बुडाली होती. कुठेही रस्सी नव्हती, त्यामुळे लोकांनी मानवी साखळी बनवली होती आणि गाडीत अडकलेल्या माणसाला वाचवले होते.

दिल्ली पोलिसांनी केली महिलेची मदत

प्रियंका कंबोजच्या गाडीचा टायर रात्रीच्या वेळी पंक्चर झाला होता. यादरम्यान प्रियंका यांना देवदूत स्वरूप दोन पोलीस कर्मचारी दिसले. प्रियंकाने आपल्या फेसबुक पेजवर पोलिसांनी आपली कशाप्रकारे मदत केली याचे वर्णन केले. ऑन-रोड सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला फोन केला असता कोणीही मदतीसाठी आले नाही. त्यानंतर पीसीआर व्हॅनचे एएसआय ओम प्रकाश व एएसआय दया किशन यांनी त्यांना मदत केली.

व्हिसा मुलाखतीसाठी महिलेला रिक्षा चालकाने केली मदत

वरीजाश्री वेणुगोपाळ यांना व्हिसा मुलाखतीसाठी ५ हजार रुपयांची मदत हवी होती. पण तिच्या एटीएममधून पैसे निघत नव्हते. त्यानंतर रिक्षाचालक बाबा यांनी पैसे देऊन त्यांना मदत केली. या घटनेची दखल घेत कोणीतरी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. जी जबरदस्त व्हायरल झाली.

सब इन्स्पेक्टरने परत केले ५०,००० रुपये

दिल्लीतील रहिवासी जसप्रीत सिंह हे आपल्या पर्समध्ये ५० हजार रुपये घेऊन फिरत होते. ते पर्स सब इन्स्पेक्टर मदनसिंह यांना सापडले आणि त्यांना ती पर्स परत केली. ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

हॉकर्सची सायकल गेली चोरीला, पोलीस भर्तीसाठी आलेल्या जवानांनी दिली नवीन सायकल

उत्तर प्रदेश पोलिसांचे महासंचालक के. पी. अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी ट्विटरवर एक गोष्ट पोस्ट केली. एका हॉकरची सायकल चोरीला गेली आहे. त्यानंतर त्यांना पोलीस भर्तीसाठी आलेल्या जवानांनी एक नवीन सायकल दिली. सोशल मीडियावर या घटनेनंतर त्याचे खूप कौतुक झाले.

दिव्यांग लोकांसाठी दिल्लीत कॅफे उघडले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो दिल्लीतील कॅफेचा होता. ज्यात असे सांगण्यात आले की कॅफे केवळ दिव्यांग लोकांसाठी चालवले जाते. हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडला होता.

Leave a Comment