आता यापुढे औषधांचे मोठे पाकीट विकत घेण्याची गरज नाही… कारण


मुंबई : मेडिकल दुकानदाराकडून रुग्णांना औषधाची एखाद-दुसरी गोळी घ्यायची आवश्यकता असताना संपूर्ण पाकीट घेण्याची सक्ती केली जाते. पण आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना औषधांची छोटी पाकिटे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

लवकरच रुग्णांना औषधांचे मोठे पाकीट विकत घेण्याऐवजी गरजेनुसार छोट्या आकाराची पाकिट खरेदी करता येणार असल्यामुळे मेडिकल दुकानदाराकडून रुग्णांना संपूर्ण पाकीट विकत घेण्याची सक्ती करावी लागणार नाही. औषधांची छोटी पाकिटे तयार करण्याचे निवेदन एफडीएने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला पत्र पाठवून दिले होटे.

रुग्णांना अनेक वेळा कमी मात्रा घेण्याची आवश्यकता असते. पण औषधांच्या स्ट्रिप्स कापणे औषध विक्रेत्यांना शक्य नसटे. औषधांच्या स्ट्रिप्स कापल्यामुळे बऱ्याचदा त्या पाकिटावरील तारीख, बॅच क्रमांक, एक्स्पायरी डेट कापली जाण्याची शक्यता असल्यामुळे मेडिकल दुकानदार ही जोखीम घेत नाहीत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला संपूर्ण माहिती असलेली औषधांची छोटी पाकिटे बनवण्यासंबंधात पत्र लिहिले आहे. औषधांचा अपव्यय आणि दुष्परिणाम होण्याला या निर्णयामुळे आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment