एअरसेलची महाराष्ट्रातील सेवा ३० जानेवारीपासून होणार बंद


नवी दिल्ली – ३० जानेवारीपासून महाराष्ट्रातील आपला व्यवसाय एअरसेल ही दूरसंचार क्षेत्रातील कंपनी बंद करणार आहे. दूरसंचार नियामक ट्रायला कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एअरसेलने महाराष्ट्रासह ६ सर्कलमधून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक दुस-या कंपनीकडे पोर्ट करण्यास सांगितले आहे.

एअरसेल लिमिटेड आणि दिश्नेत वायरलेस लिमिटेड यांच्याकडे एअरसेलची माहिती आहे. १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पश्चिममधील कंपनीला परवाना संपुष्टात आला आहे. ग्राहकांना दुस-या नेटवर्कमध्ये मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी १० मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांना यादरम्यान आपला क्रमांक दुस-या कंपनीमध्ये पोर्ट करण्यासाठी कंपनीकडून मदत करण्यात येईल असे ट्रायने म्हटले. १ डिसेंबर २०१७रोजी कंपनीचा परवाना संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ करण्याचा कंपनीकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. कंपनीचे सध्या ६ सर्कलमध्ये साधारण ४० लाख २जी ग्राहक आहेत.

Leave a Comment