मुंबईतील उद्योजकांच्या भेटीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


मुंबई – आज मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले असून त्यांनी आज फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या गुतंवणुकदार परिषदेच्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या उद्योजकांची भेट घेऊन चर्चा केली. योगींनी याबरोबरच या उद्योजकांना उत्तरप्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचे आमत्रंण दिले आहे. लखनौमध्ये पुढील वर्षी २१ व २२ फेब्रुवारी रोजी गुतंवणुदारांच्या एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री योगींचा गुंतवणूकदारांसाठी आयोजित परिषद यशस्वी करण्यासाठी मुंबईतील नरीमन पाँईटवर एक रोडशो करण्यात येणार आहे. त्यानंतर हॉटेल ट्रायडेंटमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दिग्गज उद्योगपती या रोडशोमध्ये सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यात रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

आजच्या रोडशोमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, टाटा ट्रस्टचे रतन टाटा, टाटा ग्रुप अँडचे चंद्रशेखरन, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे पवन गोयंका, एसेल ग्रुपचे सुभाष चंद्रा, हिंदुजा समूहाचे अशोक हिंदुजा, एचडीएफसीचे दीपक पारेख यासारखे दिग्गज सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे माहिती अधिकारी अनुज झा यांनी दिली.

Leave a Comment