खासगी कंपन्यांना लष्करासाठी शस्त्रे बनविण्याची परवानगी


रक्षा मंत्रालयाने खासगी क्षेत्रातील कंपन्यांना लष्करासाठी आठ प्रकारची शस्त्रे उत्पादन करण्याची परवानगी दिली असल्याचे य त्यामुळे रक्षा नितीत मोठी सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय सेनेकडे शस्त्रांची कमतरता असून अनेक शस्त्रे आयात केली जातात. भारतीय खासगी कंपन्यांना शस्त्रनिर्मितीची परवानगी दिल्याने सेनेची शस्त्र आयात कमी होईलच पण स्वदेशी शस्त्र निर्मिती क्षमतेतही वाढ होणार आहे.

देशात आज अनेक शस्त्रनिर्मिती कारखाने आहेत मात्र त्यातील बहुसंख्य सरकारी मालकीचे आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासगी कंपन्यांना विदेशी संरक्षण उत्पादकाबरोबर संयुक्त कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली गेली हेाती. त्यानुसार आता विमाने, पाणबुड्या, हेलिकॉप्टर, रणगाडे भारताच बनविले जाणार आहेत.

Leave a Comment