२४ वर्षांनंतर जन्माला आले ‘मुल’, मुलीपेक्षा दीड वर्षांनी मोठी आहे आई!


आयवीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणेद्वार अमेरिकेतील आणखी एक नवा विक्रम बनवला आहे. २४ वर्षापूर्वी फ्रोजन केलेल्या एका भ्रूणामार्फत बाळाचा जन्म झाला आहे. हे गर्भधारणा आणि बाळाचा जन्मा यातील सर्वात मोठे अंतर आहे. एमा रेना गिब्सन असे या बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. टीना गिब्सन नावाच्या महिलेच्या गर्भात या बाळाच्या भ्रृणाला ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबर या बाळाने महिन्यात जन्म घेतला आहे.

या बाळाच्या जन्माच्यावेळी टीनाने म्हटले की तुम्हाला अंदाज येईल की मी फक्त २५ वर्षाची आहे. आज हे भ्रूण आणि मी चांगले मित्र झाले असतो. त्यामुळे या बाळातील अंतर खूप महत्वाचे ठरत आहे. टिना पुढे म्हणते की, एका बाळाला मला जन्म द्यायचा होता. पण मला माहित नव्हते की हा एक विश्वविक्रम होऊ शकतो.

बाळासाठी येथील राष्ट्रीय भ्रृणदान केंद्र म्हणजे नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरशी टीनाने संपर्क केला होता. या केंद्रात भृणाला फ्रोजन जमा केले जाते आणि यामुळेच हे भ्रृण खूप काळ जीवंत राहते. आपण या बाळांना स्नो बेबी बोलू शकतो. जे दाम्पत्य बाळाला जन्म देऊ शकत नाही त्यांच्यासाठी एम्ब्रियो डोनेशन सेंटरमध्ये खास भ्रृण सुरक्षित ठेवले जातात.

बाळाला जन्म देण्यासाठी टीनाचा नवरा बेंजामिन गिब्सन सक्षम नसल्यामुळे हे भ्रृण त्यांनी दान घेण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याला यासाठी अनेक चौकशीमधून जावे लागले. टीनाच्या पोटात मार्च महिन्यात भ्रृण ठेवण्यात आल्यानंतर तिने नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म दिला. या बाळाच्या अगोदर २० वर्षाच्या भ्रृणाने जन्म घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

Leave a Comment