हे आहेत २०१७चे सर्वात मजेदार फोटो, जे बघून तुम्ही पोटभर हसाल


नवी दिल्ली: तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पाहिलीच असेल ज्यात प्राण्यांचे क्लोज-अप फोटो दाखवले जातात. ते पाहण्यास खुपच दिसतात पण तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचे मजेदार फोटो कधी पाहिले आहेत का? जेथे फोटोग्राफीच्यावेळी प्राणी संपूर्ण मूडमध्ये दिसतात.

छायाचित्रकार पॉल जॉन्सन हिक्स यांनी वन्यजीव संवर्धनाबद्दल २०१५मध्ये जागृतीसाठी एक अनन्य मोहिम सुरू केली. त्यांनी कॉमेडी फोटोची स्पर्धा सुरु केली. तर दरवर्षी प्रत्येक वर्षी सहभागी सर्वोत्तम फोटोज पाठवतात. त्यातील सर्वोत्तम फोटो काढून विजेता घोषित केला जातो.

एबीसीच्या वृत्तानुसार, स्पर्धेचे सह-संस्थापक टॉम सुल्लम म्हणाले, स्पर्धेत संरक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले जाते, तसेच सोबतच प्राण्यांचे असे फोटो असावे कि लोकांच्या चेह-यावर हसू येईल.

कॉमेडी वाइल्डलाइफ फोटोग्राफी पुरस्कार बॉर्न फ्री फाउंडेशनचे समर्थन करतात. जे प्राणी संरक्षणासाठी काम करतात. त्याचे ध्येय जीवन वाचविणे, बळी पडणे टाळणे आणि जंगलातील प्रजातींचे संरक्षण करणे आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी गेल्या वर्षी या पुस्तकाचे नाव ‘वाइल्ड व क्रेजी’ ठेवले आहे. या वर्षाच्या पुस्तकाला हेल्प असे नाव देण्यात आले आहे. कारण टिबोर केरकॉकच्या फोटोमध्ये घुबडच्या झाडावरून पडण्याचे टाळत आहे. चला तर बघुया कसे आहेत ते फनी कॉमेडी वाइल्डलाइफ फोटो ज्यातून सर्वोत्कृष्ट फोटोंची निवड करण्यात आली.

एका झाडावर तीन घुबड बसले आहेत. अचानक एका घुबडाचा तोल जातो आणि खाली पडत असतो. पण तो एक पायामुळे लटकला जातो. तिथे दोन घुबड आहेत. हा फोटो संस्थापकांनी सर्वोत्तम मानला असून या ४ फोटोला टिबोर काराकसने क्लिक केले आहे.

या फोटोमध्ये एक उंदीर फुलावर बसलेला आहे आणि हसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झालं आहे. एन्ड्रिया जमपातीने हा फोटो क्लिक केला आहे.

या चित्रात, एक प्राणी इतर प्राण्याकडे पाहून आश्चर्यचकित आहे. हा फोटो जॉर्ज कोथकार्ट यांनी क्लिक केला आहे.

या चित्रात, ध्रुवीय अस्वल बर्फाच्या पर्वतावरून उतरत आहे आणि त्याच्यामागे त्याचे पिल्लू चढण्याचा प्रयत्न करीत आहे. हा फोटो डेजी गिलार्दिनीने क्लिक केला आहे.

या चित्रात डोंगराच्या मध्यभागी असलेले एक चर्च दिसत आहे. जे पाहायला तीन पेंग्विन जात आहेत. असे दिसते की ते चर्चमध्ये प्रार्थना करण्यास जात आहेत. हा फोटो कार्ल हॅरीने क्लिक केला आहे.

या फोटोमध्ये, गोल्फच्या क्षेत्रातील खांबाजवळ एक प्राणी लघुशंका करत आहे. हा खरोखरच अजब फोटो आहे कारण त्या प्राण्याला माहीत नाहीत कि त्याला येथे कशासाठी उभे केले आहे. डग्लस क्रॉफ्टने हा फोटो क्लिक केला आहे.

समुद्रामध्ये व्हेलला सर्वात धोकादायक मासा मानले जाते आणि कासव म्हणजे शांततेचे प्रतिक. हा फोटो असे दर्शविते की कासव समुद्रात पोहत आहे आणि अचानक जेव्हा व्हेल दिसतो तेव्हा कासव त्याला हुसकावून लावतो. हा फोटो ट्रॉय मेल्स यांनी क्लिक केला आहे.

या फोटोमधील प्राणी पाण्यात खेळत आहे. हा फोटो पेनी पार्करने क्लिक केला आहे.

माकड हे सर्वात खोडसाळ समजले जाते. या फोटोमध्ये दोन चिंपांझी गाडीवर बसलेले आहेत आणि असे वाटते कि ते ही गाडी चालवत आहेत. हा फोटो केटी लेवेक फोस्टर यांनी क्लिक केला आहे.

या फोटोमध्ये ससा गार्डनमध्ये उभा आहे आणि तोंडात गवत भरून कॅमे-याकडे पाहत आहे. हा फोटो ऑलिव्हर कॉलिने क्लिक केला आहे.

या फोटोला अॅनीमल एन्काऊंटर असे नाव देण्यात आले आहे. ज्यात असे वाटते कि एक प्राणी अनेक प्राण्यावर गभ आहे. हा फोटो जीन एल्कलीने क्लिक केला आहे.

या छायाचित्रातील पक्षी हवेत उडत आहेत. परंतु या फोटोतील विशिष्ट गोष्ट अशी आहे की त्याच दरम्यान तिथून एक रॉकेट निघून गेले आहे. पक्षी एकाच वेळी बाहेर येतात. असे दिसते की पक्षी लाँच केले गेले आहे. हा फोटो जॉन थ्रेलफॉल ने क्लिक केला आहे.

या छायाचित्रांत, दोन प्राणी अतिशय आश्चर्यचकित झाले आहेत आणि आकाशाकडे पाहत आहेत. डॅनियल ट्रिमने हा फोटो क्लिक केला आहे.

Leave a Comment