दारूची झिंग देणारे पण शरीराचे नुकसान न करणारे अल्कोहोल तयार


येत्या दहा वर्षात युवा पिढी अल्कोहोलमुक्त होईल असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. कारण या संशोधकांनी दीर्घ काळच्या संशोधनानंतर सिंथेटिक अल्कोहोल तयार केले असून त्याला अल्कोसिंथ असे नांव दिले आहे. प्रोफेसर डेवीड नेट व त्यांच्या टीमने हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

पाश्चात्य जगात अल्कोहोल सेवन हा काळजीचा विषय बनला असून जगभंरातच या व्यसनाबाबत चिंता केली जात आहे. प्रो. नेट म्हणाले त्यांनी असे अल्कोहोल तयार केले आहे ज्याचे सेवन केल्यानंतर मदिरापानानंतर मिळणारी झिंग मिळेल पण या अल्कोहोलचा यकृत अथवा शरीरातील अन्य अवयवांवर कोणताही घातक परिणाम होणार नाही. अल्कोसिंथ असे नामकरण केलेल्या या पेयामुळे मदिरापानाचा अनुभव येईल पण हँग ओव्हरपासून बचावही होईल. नेट यांच्या कंपनीने सिंथेटिक अल्कोहोल निर्मितीसाठी १२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही जाहीर केले आहे. ब्रिटन, अमेरिका तेसच युरोपात हँगओव्हर फ्री अल्कोहोल मिळू शकणार आहे.

Leave a Comment