बायकोच्या जाचाला कंटाळून ९ वर्षांपासून विमानतळावरच राहत आहे ही व्यक्ती


संसार म्हटला कि भांड्याला भांडे लागतेच. त्यातच काही नवरे आपल्या मित्राकडे आपली बायको कशी भांडकुदळ हे सांगायला देखील कमी करत नाही. पण बीजिंगमध्ये राहणारा एक व्यक्ती या गोष्टीला अपवाद ठरला आहे. त्याचे नाव वेई जिआनगुओ असे आहे. जिआनगुओला आपल्या बायकोचा भांडकुदळ स्वभाव अजिबात पटला आणि बायकोचा सारखा जाच होऊ लागल्यावर वेई यांनी आपले बस्तान घरातून थेट बीजिंगच्या विमानतळावर हलवले.

ते मागील ९ वर्षांपासून बीजिंग विमानतळावरच राहत असून त्याचे त्याचा बायकोसोबत २००८ मध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर आपले घर त्यांनी कायमचे सोडले. त्यांनी विमानतळावरचा एक चांगला कोपरा निवडून आपले बस्तान तिथे मांडले. त्यांच्यावर एक व्हिडिओही ‘पिअर व्हिडिओ’ने तयार केला असून विमातळावरचा हा छोटासा कोपरा आता आपले घर झाले असल्याचे ते सांगतात. त्यांनी येथे विजेवर चालणारी छोटीशी शेगडीही घेतली आहे. त्यामुळे ते तिथेच स्वयंपाक करतात आणि तिथेच झोपतात. सरकारकडून त्यांना दरवर्षी ठराविक रक्कमेचे अनुदान मिळते.

वेईने ही जागा बीजिंगच्या विमानतळावर राहायला आल्यापासून क्वचितच सोडली असेल. ते विमानतळातून फक्त जेव्हा काही आवश्यक वस्तू आणायच्या असतील तरच बाहेर पडतात. या विमातळावरील कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांना तिथून ह्कालावून देण्याचा प्रयत्न केला गेला, पण वेई यांना हुसकावून लावण्यात त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. वेई विमानतळावरचा सुरक्षा बंदोबस्त कडक असला की आपले बस्तान तात्पुरते दुसरीकडे हलवतात. त्यानंतर ते पुन्हा विमानतळावर येतात.

Leave a Comment