बिटकॉईनची तासात १ हजार डालर्सने घसरगुंडी


गेल्या कांही दिवसांपासून दररोज सातत्याने किमतींचा चढता आलेख नोंदवित असलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या दरात बुधवारी अचानक घरसगुंडी झाली असून अवघ्या १ तासात त्याचे दर १ हजार डॉलर्सने घसरले असल्याचे समजते. ही घट १५ टक्के इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार द. कोरियातील शेअर एक्स्चेंज मार्केट हॅक झाल्याची बातमी पसरताच बिटकॉईनच्या दरात नाट्यमय घरसण झाली. या आठवड्याच्या सुरवातीला १९५०० डॉलर्सवर असणारे बिटकॉईनचे दर १ तासात १७३७६ डॉलर्सवर आले. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या बातमीनुसार द.कोरिया शेअर मार्केट हॅकिंगपाठोपाठ अमेरिकेत बिटकॉईन संबंधी एक शेअर बाजार व्यवसाय निलंबित करण्यात आल्याच्या बातमीचा प्रभाव बिटकॉईनच्या दरांवर पडला. बिटकॉईनचे शेअर मूल्य सप्टेंबरच्या अखेरीपासून सोमवार पर्यंत १७०० टक्कयांनी वाढले होते.

Leave a Comment